technology

'आयफा' पुरस्कारांसाठी अभिनेत्यांमध्ये चढाओढ!


यंदाच्या 'इंटरनॅशनल इंडियन फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार' (आयफा)मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी चांगलीच चढाओढ लागली असून, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीमध्ये हृतिक रोशन (गुजारीश), सलमान (दबंग), अजय देवगण (वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई) आणि शाहरुख खान (माय नेम इज खान) यांच्या नावाचा समावेश आहे. चित्रपटसृष्टीतील या दिग्गज अभिनेत्यांमध्ये रणबीर कपूर (राजनीती) या एकमेव युवा अभिनेत्याला नामांकन प्राप्त झाले आहे.
हा आयफा पुरस्कार सोहळा २३ ते २५ जूनदरम्यान टोरँटोमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सर्वश्रेक्त अभिनेत्रीचा पुरस्कार मिळविणार्‍या प्रमुख दावेदारांच्या यादीमध्ये ऐश्वर्या रॉय बच्चन (गुजारीश), करिना कपूर (गोलमाल-३), विद्या बालन (इश्किया), कॅटरिना कैफ (राजनीती) आणि अनुष्का शर्मा (बँड बाजा बारात) यांना नामांकित केले आहे.
सर्वश्रेक्त दिग्दर्शकाच्या यादीमध्ये संजय लीला भंसाली आणि करण जोहरसह मनीष शर्मा (बँड बाजा बारात), विक्रमादित्य मोटवानी (उडान), अभिनव कश्यप (दबंग) आणि मिलन लुथरिया (वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई) यांच्या नावांचा समावेश आहे.
Share on Google Plus

About admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment