technology

आता शिल्पाकडे 'गूड न्यूज'

मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय-बच्चन हीने यावर्षी कन्यारत्नाला जन्म दिल्यानंतर, पुढल्या वर्षी २०१२ मध्ये बॉलिवूड सेन्सेशन शिल्पा शेट्टीकडे पाळणा हलणार आहे. उद्योगपती राज कुंद्रा यांच्याशी विवाह केलेली शिल्पा सध्या गरोदर असून येत्या मे महिन्यात ती बाळाला जन्म देईल. शिल्पाच्या या बातमीमुळे सध्या कुंद्रा कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येकजण शिल्पाची काळजी घेत असून, स्वतः राज कुंद्रा जास्तीत जास्त वेळ शिल्पासोबत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर याआधीही एकदा शिल्पा गरोदर होती. पण काही कारणामुळे तिचा गर्भपात झाला होता. त्यामुळे यावेळी शिल्पा आणि कुंद्रा कुटुंबीय विशेष काळजी घेत आहेत. तिला अधिकाधिक आराम मिळावा आणि तिचे डोहाळे पुरवण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. ती स्वतः नियमित योगाभ्यास करणार आणि फिटनेसची काळजी घेणारी आहे. त्यामुळे गरोदरपणाच्या या काळातही ती आवश्यक तो व्यायाम नियमित करत आहे. तसेच या नाजूक काळात फार बाहेर न फिरण्याचीही ती काळजी घेते आहे. शिल्पा-राज कुंद्रा यांची आधीपासून मैत्री होती. अनेक दिवस एकमेकांच्या प्रेमात घालवल्यानंतर २२ नोव्हेंबर २००९ रोजी ते विवाहबद्ध झाले होते. त्यांच्या या प्रेमाला आता एक अंकुर फुलणार असून, प्रेक्षक पुन्हा एकदा 'मामा' बनणार आहेत.
Share on Google Plus

About admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment