अयान मुखर्जी आपल्या येणाऱ्या चित्रपटात रणवीर कपूरबरोबर कतरीनाला घेण्यास इच्छुक आहे. कतरीनाला कथाही पसंत पडली आणि तिने चित्रपटासाठी आपली हमी ही होकारही दिला होता पण आता कतरीनाने आपला विचार बदलला असून ती रणवीर सोबत काम करण्यास इच्छुक नाही आहे. म्हणून आता चर्चा अशी आहे की तिच्या जागेवर अनुष्काला घेण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार कतरीना आता तिच्या आणि रणवीरच्या संबंधांबद्दल लोकांना बोलायची संधी देत नसून तिने रणवीर सोबत काम करण्यास नकार दिला आहे.
कतरीनाच्या या निर्णयावर अयान आश्चर्यचकित झाले. ऐन मोक्यावर त्याच्यासाठी नवीन अभिनेत्रीचा शोध लावणे फारच अवघड होते, बऱ्याच नावांचा विचार करून त्याने अनुष्का शर्मा घेण्याचा निर्णय घेतला. सद्या अनुष्का आपल्या डेटस एडजस्ट करण्यात लागली आहे कारण तिच्या नवीन चित्रपटाची शूटिंग सुरू होणार आहे पण तिला रणवीर कपूरबरोबर काम करण्याची संधीही मुकायची नाही आहे. अनुष्काकडून होकार मिळाल्यानंतरच तिच्या नावाची घोषणा करण्यात येईल.
0 comments:
Post a Comment